बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच लागून असते. खरंतर अमिताभ यांनी संपत्ती ही कोट्यावधींमध्ये आहे. तर अमिताभ यांनी त्यांची मालमत्ता वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बऱ्याचकाळापासून अमिताभ आणि बीएमसी यांच्यात प्रतीक्षा या बंगल्यावरून वाद सुरु आहे. बीएमसी संत ज्ञानेश्वर मार्ग रुंद करण्यासाठी त्यांच्या बंगल्याची भिंत पाडणार असल्याची चर्चा आहे. ज्यासाठी अमिताभ यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
तर हायकोर्टाने अमिताभ यांना दिलासा देणारी बातमी देत बीएमसीसमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे. तर या काळात बीएमसीला अमिताभ यांच्या बंगल्यावर कोणतीही कारवाई करण्यास बंदी घातली आहे. या सुनावणीत उच्च न्यायालयाने बीएमसीला विचार करून अमिताभ बच्चन यांच्याशी बोलण्यास सांगितले आहे. सध्या तरी बीएमसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री
बीएमसी ज्या रस्त्याचं रुंदीकरण करत आहे, त्याच रस्त्यावर अमिताभ यांचा हा बंगला आहे. हाच रस्त्या इस्कॉन मंदिराकडे जातो. सध्या या रस्त्याची रुंदी ही ४५ फूट आहे. तर बीएमसीला या रस्त्याची रुंदी ही ६० करायची आहे. यासाठीच बीएमसीने अमिताभ यांना त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेली भींत तोडण्याची नोटिस पाठवली होती.
आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका
याच परिसरात अमिताभ यांचे आणखी ३ बंगले आहेत. अमिताभ यांचे मुंबईत एकूण ५ बंगले आहेत. ७० च्या दशकात अमिताभ हे प्रतीक्षा या बंगल्यात शिफ्ट झाले होते. सध्या ते कुटुंबासह जलसा या त्यांच्या बंगल्यात राहतात. हा बंगला दोन मजली आहे. अमिताभ यांचा तिसरा बंगला ‘जनक’ आहे, ज्यात त्यांनी त्यांची फिल्म कंपनी सरस्वती पिक्चर्सचे ऑफिस बनवले आहे. त्यांचा चौथा बंगला ‘वत्स’ असून पाचवी मालमत्ता जलसाजवळ असल्याचे सांगितले जाते.