बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॉम्बे वेल्वेट’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी खंडन केले आहे. दिग्दर्शक अनुराग यांनी टि्वटरवर धाव घेत रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा अभिनय असलेला हा चित्रपट १५ मे रोजीच प्रसिद्ध होणार असल्याचा खुलासा केला आहे. टि्वटरवरील संदेशात त्यांनी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे सांगत, ‘बॉम्बे वेल्वेट’ १५ मे रोजीच प्रदर्शित होणार असून, त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. करण जोहरची खलनायकाची भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी सुरुवातीला गेल्या वर्षीचा नोव्हेंबर महिना निश्चित करण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक कामे बाकी असल्याने उशीर झाला. इतिहासाचार्य ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल’ पुस्तकावर आधारीत या चित्रपटात जाझ गायिकेच्या व्यक्तिरेखेत दिसणाऱ्या रविना टंडनने पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यानच्या दृष्यांमधील बदलामुळे चित्रपटातून बाहेर पडणे पसंत केले.
‘बॉम्बे वेल्वेट’ १५ मेलाच प्रदर्शित होणार – अनुराग कश्यप
बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉम्बे वेल्वेट'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी खंडन केले आहे.
First published on: 23-01-2015 at 01:37 IST
TOPICSअनुराग कश्यपAnurag Kashyapअनुष्का शर्माAnushka SharmaमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanरणबीर कपूरRanbir Kapoorहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 4 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay velvet not postponed releases on may