चित्रपटकर्ता बोनी कपूर यांची गाडी एका ट्रॅक्टरवर आदळल्यानंतर झालेल्या अपघातात बोनी कपूर यांना हलकीशी दुखापत झाली आहे. हा अपघात बुधवारी रात्री (१४ मे) वाईजवळ झाला. गेले काही दिवस बोनी कपूर ‘तेवर’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी सातारा आणि वाईमध्ये वास्तव्याला आहेत. या चित्रपटात त्यांचा मुलगा अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा काम करत आहेत. वीर धरण परिसरातील दिवसभराचे शुटिंग संपवून बोनी कपूर सखरेवाडी गावाजवळील आपल्या हॉस्टेलवर परतत असताना हा अपघात झाला. बोनी कपूर आणि गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते.

Story img Loader