अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट २०१८मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. चित्रपटाची अजबगजब कथा, कलाकरांचा भन्नाट अभिनय यामुळे चाहत्यांनी चित्रपटाला उचलूनच धरले होते. आता चित्रपटाता रिमेक येत आहे. हा चाहत्यांना सुखद धक्काच असणार आहे. तसेच ‘बधाई हो’चा रिमेक दक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन बोनी कपूर करणार असून चित्रपटाचे सर्व हक्क त्यांनी विकत घेतल्याचे समोर आले आहे. तसेच चित्रपटाचा रिमेक कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये बनणार आहे.

‘बधाई हो चित्रपट सर्वांनाच आवडेल असा आहे. त्यामुळे चित्रपटाचा रिमेक दक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यासाठी मी उत्साहीत आहे. ‘बधाई हो’चे जगभरात खूप कौतुक झाले. म्हणून आता दक्षिणात्य भाषांमधील हा चित्रपट तुफान चालेल असा माझा विश्वास आहे. मी लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे’ असे दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांनी म्हटले.

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपटात आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव हे कलाकार झळकले होते. चित्रपटाने २०१८मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये देखील समावेश केला होता

Story img Loader