‘स्पेशल २६’च्या बॉक्स ऑफिसवरील यशामुळे अभिनेता अक्षय कुमारची नव्या वर्षाची सुरूवात धमाक्यात झाली आहे. आणि आता अक्षयचे संपूर्ण लक्ष आपला आगामी चित्रपट ‘बॉस’ वर केंद्रीत आहे. अॅन्थनी डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे अक्षय पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत परतणार आहे.
अक्षयकुमारने टि्वट केले आहे कि, थायलंडमधून ‘बॉस’ निघत आहे. आजवरच्या माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण चित्रिकरण. ज्या वेळेस अभिनेत्याला त्याचे काम अधिक खुणावत असते, अशा प्रकारचा हा क्षण आहे.
चित्रपटाबाबतची इतर माहिती अद्याप उपलब्ध झाली नसली तरी, आपला आपल्या आवडत्या अॅक्शन हिरोला पुन्हा त्याच अवतारात पाहण्यास तुम्ही उत्सुक असाल याबाबत आम्ही खात्री आहे.
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणा-या या चित्रपटात आदिती राव हिदारी, शिव पंडित, मिथून चक्रवर्ती, डॅनी डेन्झोन्पा आणि जॉनी लिव्हर यांच्याही भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा