सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपर यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’, समांथा रूथ प्रभूचा ‘यशोदा’ आणि मार्वेलचा ‘वकांडा फॉरएवर’ या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकत्रच हजेरी लावली आहे. त्यापैकी मार्वेलचा चित्रपटाचा चाहतावर्ग सर्वात मोठा असल्याने त्या चित्रपटासाठी गर्दी होणं स्वाभाविक होतं, पण इतरही दोन चित्रपट चांगली कमाई करत असल्याचं समोर आलं आहे.

कौटुंबिक मूल्यं आणि परंपरा जपणाऱ्या राजश्री प्रोडक्शनखाली बनलेल्या ‘उंचाई’ या चित्रपटातून दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी बऱ्याच वर्षांनी पुन्हा पदार्पण केलं. चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी, नीना गुप्ता, सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.८१ कोटी इतकी कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास ३.५० कोटी एवढी कमाई केली असून आत्तापर्यंत ‘उंचाई’ने एकूण ५.३१ कोटी इतकी कमाई केली आहे.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amitabh Bachchan shouted at R Balki
दिग्दर्शकाच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन; चिडलेले अमिताभ बच्चन त्याच्यावर सर्वांसमोर ओरडलेले अन्…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
Amitabh Bachchan
अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य

आणखी वाचा : शाहरुख खानने मुंबई विमानतळावर भरला रितसर कर, कस्टम ड्यूटी प्रकरणात वेगळ्याच गोष्टीचा खुलासा

याचबरोबरीने दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाचा ‘यशोदा’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. समांथाला झालेल्या मायोसायटीस या आजारामुळे या चित्रपटाचं फारसं प्रमोशनही तिला करता आलं नाही. तरी या चित्रपटाने चक्क बच्चन यांच्या चित्रपटाला टक्कर दिली आहे. ‘यशोदा’ने पहिल्याच दिवशी ३.०६ कोटी इतकी कमाई केली आहे, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४ कोटीची कमाई केली. अशाप्रकारे या चित्रपटाने तब्बल ७ कोटी इतकी कमाई केली आहे.

हॉलीवुड चित्रपट ‘ब्लैक पैंथर: वकंडा फॉरएवर’ने मात्र सगळ्या भारतीय चित्रपटांना मागे टाकत आत्तापर्यंत २६ कोटी इतकी कमाई केली आहे. १२५० कोटी इतकं बजेट असलेल्या या चित्रपटाची कमाई त्यामानाने कमीच आहे, पण येणाऱ्या काही दिवसात हे आकडे आणखी वाढतीय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ अजूनही चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. याने तर बॉक्स ऑफिसवर जगभरात ३०० कोटीहून अधिक कमाई केली आहे.