जगज्जेती बॉक्सर मेरी कोम हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता मुष्ठियोद्धा मेरी कोम अॅनिमेट रुपात दिसणार आहे. भारतात महिलांवर काढण्यात येणारी पहिली सुपरहिरो सिरीज ‘मेरी कोम ज्युनिअर’मध्ये ती झळकेल.
स्क्रीनयुग क्रिएशन प्रा लि या कंपनीसह मेरीने लेखी करार केला आहे. या सुपरहिरो सिरीजमुळे लहान मुलींना प्रेरणा मिळेल असे मेरीचे मत आहे. आता लहान मुलींची अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे.  मुलींनी अधिक बलवान आणि धीट व्हावयला हवे, असे मेरी म्हणाली. या अॅनिमेटेड सुपरहिरो सिरीजचे निर्मिती आशिष कुलकर्णी करत आहे. आशिष यांनी यापूर्वी लिटल कृष्णा, शक्तीमान, कृष्णा और कंस आणि बिग बीज यांची निर्मिती केली होती.

Story img Loader