बॉलिवूड चित्रपटांकडे सध्या प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘दोबारा’, ‘लायगर’ सारखे बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अगदी सुपरफ्लॉप ठरले. इतकंच नव्हे तर नव्याने येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटांना बॉयकॉट या ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. यामध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचाही समावेश आहे. पण बॉयकॉट या ट्रेंडमुळे शाहरुखने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – मुलाचा जन्म झाला अन् १२ दिवसांमध्येच कामावर परतली भारती सिंह, म्हणाली, “काम केलं नाही तर…”

‘बॉयकॉट पठाण’ (#BoycottPathan) ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’प्रमाणे ‘पठाण’ला देखील प्रेक्षकांचा विरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. बऱ्याच काळानंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. पण बॉयकॉट ट्रेंडमुळे प्रदर्शनाआधीच त्याचा हा चित्रपट नकारात्मक चर्चेत आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाहरुखने एक महागडा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ‘डॉन ३’ चित्रपटासाठी शाहरुखला विचारणा करण्यात आली होती. मात्र बॉयकॉट ट्रेंड आणि बॉलिवूडची सध्याची परिस्थिती पाहता त्याने हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘डॉन ३’ चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शाहरुख फार उत्साही असल्याचं याआधी समोर आलं होतं. फरहान अख्तरने या चित्रपटाच्या कथेसाठी बरीच मेहनत देखील घेतली होती.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

पण ‘डॉन’ ही सुपरहिट भूमिका पुन्हा रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी अधिक मेहनत आणि योग्य त्या वेळेची गरज आहे असं शाहरुखचं म्हणणं आहे. शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycott trend effect shahrukh khan rejected don 3 movie after bollywood film flop on box office see details kmd
Show comments