बाहत्तराव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहूड’ या चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले असून त्यात दिग्दर्शक व उत्कृष्ट कथा पुरस्काराचा समावेश आहे तर वेस अँडरसन यांच्या ‘द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल’ या काहीशा विक्षिप्त विषयवारील चित्रपटास संगीत व विनोदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट व चित्रवाणी मालिकांसाठी हे पुरस्कार दिले जातात.
‘बॉयहूड’मध्ये लिंकलेटर यांनी एका मुलात वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याच्या अठराव्या वर्षांपर्यंत होत गेलेले बदल टिपले आहेत. उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारही याच चित्रपटातील पॅट्रिशिया अरक्वेट यांना मिळाला आहे.  उत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म म्हणून ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन २’ उत्कृष्ट ठरला. रशियाचा ‘लेव्हियाथन’ हा परदेशी भाषेतील चित्रपट गटात सवरेत्कृष्ट ठरला. त्याने ‘इडा’, ‘फोर्स मॅज्युअर’, ‘टँगरीन्स’ व ‘गेट- द ट्रायल ऑफ व्हिव्हियन अमासलेम’ यांना मागे टाकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरस्कार विजेते
* उत्कृष्ट चित्रपट (नाटय़)- बॉयहूड
* उत्कृष्ट सांगीतिक व विनोदी चित्रपट- द ग्रँड बुम्डापेस्ट हॉटेल
* अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म- हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन २
* चित्रवाणी मालिका- नाटय़- द अफेअर
* चित्रवाणी मालिका (सांगीतिक व विनोदी)- ट्रान्सपरंट
* चित्रवाणीवरील चित्रपट- फार्गो

पुरस्कार विजेते
* उत्कृष्ट चित्रपट (नाटय़)- बॉयहूड
* उत्कृष्ट सांगीतिक व विनोदी चित्रपट- द ग्रँड बुम्डापेस्ट हॉटेल
* अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म- हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन २
* चित्रवाणी मालिका- नाटय़- द अफेअर
* चित्रवाणी मालिका (सांगीतिक व विनोदी)- ट्रान्सपरंट
* चित्रवाणीवरील चित्रपट- फार्गो