जागतिक महायुद्धावर आधारीत ब्रॅड पिटचा ‘फ्युरी’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी भारतात प्रदर्शित होत आहे. ट्रेनिंग डे आणि फास्ट अॅण्ड दी फ्युरिअस चित्रपटांसारखे प्रसिद्ध चित्रपट बनवणारे दिग्दर्शक डेव्हिड अयेर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात ब्रॅड पिटबरोबर शिआ लबेओफ, लोगन लेरमन, मायकल पेन आणि जॅसन आयझॅक यांच्यादेखील भूमिका आहेत. १९४५ साली दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या अखेरीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात ब्रॅड पिट सेनादलातील वॉरडॅडी नावाच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो पाच जणांची तुकडी असलेल्या ‘फ्युरी’ नावाच्या शर्मन टॅंकचा प्रमुख आहे. भारतात या चित्रपटाच्या वितरणाचे अधिकार पीव्हीआर पिक्चर्सला देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा