रणबीर आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. बॉयकॉट ट्रेंड अगदी जोमात असूनही या चित्रपटाच्या कमाईवर तसा फारसा परिणाम झाला नाही. प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ ८ दिवसात चित्रपटाने देशात २०० कोटी आणि जगभरात ३०० कोटी इतकी कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरचं पात्र म्हणजेच ‘शिवा’ हे आलियाच्या पात्राशिवाय म्हणजेच ‘ईशा’शिवाय अपूर्ण आहेत तसंच खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांवर किती अवलंबून आहेत याचा खुलासा या दोघांनी एका मुलाखतीमध्ये केला.

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या दोघांना हा प्रश विचारला तेव्हा रणबीरने उत्तर दिलं की, “मी वरवर खूप दाखवतो की मी खूप स्वावलंबी आहे. पण खरं सांगायचं झालं तर मी आलियावर प्रचंड अवलंबून आहे. आलिया कुठे आहे जोवर मला कळत नाही तोवर मी खाणं-पिणं, अंघोळ या सगळ्याचा मला विसर पडतो. तिचं माझ्या आसपास असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही भले एकमेकांशी बोलणार नाही, पण तिचा सहवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

या मुलाखतीमध्ये आलियानेसुद्धा हे सगळं मान्य केलं. तिनेही रणबीरच्या वक्तव्याला दुजोरा दिला. आलिया म्हणाली, “खरंच त्याचं माझ्यावाचून खूप अडतं. आम्ही भले एकमेकांशी रोमॅंटिक गप्पा मारत नाही. पण आम्हाला एकमेकांचा सहवास सतत हवा असतो. मी आसपास नसेन तर रणबीरचं काहीच खरं नसतं.”

आणखी वाचा : “एक दिवस सुट्टी घ्या आणि..” पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारं शाहरुख खानचं ट्वीट व्हायरल

रणबीर आणि आलिया यांचं नुकतंच लग्न झालं होतं. शिवाय काही महिन्यांपूर्वी आलिया गरोदर असल्याची बातमीही त्यांनी अशाच फिल्मी स्टाइलमध्ये शेअर केली होती. त्यांच्या या नवीन सुखी संसाराविषयी त्यांनी या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणे गप्पा मारल्या. दोघांचंही ब्रह्मास्त्रमधील काम लोकांना प्रचंड आवडलं असून प्रेक्षक त्यांच्या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Story img Loader