छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा अतिशय लोकप्रिय रिएलिटी शो आहे. केवळ हिंदीच नाही तर इतर भाषेतील या शोवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. कलाकारांचे भांडण-तंटे, बिग बॉसच्या घरात खेळले जाणारे खेळ, स्पर्धकांची मजा-मस्ती या सगळ्यामुळे हा शो प्रेक्षक आवडीने पाहतात. गेली अनेक वर्ष ‘बिग बॉस हिंदी’चे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खान करताना दिसत आहे.

तेलुगु भाषेतील ‘बिग बॉस’ शोही लोकप्रिय आहे. या शोचा सहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस तेलुगु ६’ शोचे सूत्रसंचालन दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन करत आहेत. परंतु छोट्या पडद्यावरील रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करणे, नागार्जुन यांच्यासाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांनी सलमान खानकडून टिप्स घेतल्याचा खुलासा नुकताच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

हेही वाचा >> चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला “अतिशय दुर्दैवी…”

नागार्जुन म्हणाले, “’बिग बॉस तेलुगु’ शोच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन करणे माझ्यासाठी फार कठीण गेले. परंतु, नंतर मी सलमान खानचं सूत्रसंचालन पाहिलं. तो खूपच मजा-मस्ती, स्पर्धकांची फिरकी घेत शोचं सूत्रसंचालन करत होता. मीसुद्धा मनोरंजक पद्धतीने सूत्रसंचालन करायला सुरुवात केली. त्यानंतर खूप मजा यायला लागली. स्पर्धकांबरोबरही मी मजा-मस्ती करत गप्पा मारायला लागलो”.

हेही वाचा >> नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझा मुलगा आता…”

नागार्जुन प्रत्येक भाषेतील बिग बॉस बघत असल्याचंही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “मी हिंदी ‘बिग बॉस’ आवर्जुन बघतो. कमल हासन होस्ट करत असलेले तामिळ आणि मोहनलाल सूत्रसंचालन करत असलेले मल्याळम भाषेतील ‘बिग बॉस’ही मी बघतो. या प्रत्येक शोमधून मला खूप काही शिकायला मिळतं. हे शो बघितल्यानंतर मी नोट्स काढतो आणि तेलुगु बिग बॉसमध्ये त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो”.

हेही पाहा >> Photos : प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपटातही नागार्जुन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून दिसतात. ‘नंदी अस्र’ या भूमिकेत ते आहेत. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

Story img Loader