आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या ५-६ दिवस आधीच तिकीट खिडकी उघडली आहे. ‘ब्रह्मास्त्र’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून सुरुवातीचे आकडे पाहता या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळू शकते, असा अंदाज आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिंदीसह दक्षिणेच्या अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा बिग बजेट चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करणार आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला मागे टाकतो का याची सर्वांना उत्सुकता आहे.
‘ब्रह्मास्त्र’ ची आगाऊ तिकिट विक्री शुक्रवार, २ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि सुरुवातीची आकडेवारी ही चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन आशा वाढवणारी आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त तिकिटे विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. हे आकडे पाहता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगली सुरुवात होऊ शकते, असे मार्केटिंगमधील जाणकारांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा- आलिया-रणबीरच्या होणाऱ्या बाळाला नागार्जुनने दिला खास आशीर्वाद, दोघांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद
रिपोर्ट्सनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ हिंदीची आतापर्यंत ५१ लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. यापैकी ३८ लाख रुपये किमतीची ३डी तिकिटे, ११.५ हजार रुपयांची २डी तिकिटे, तर १२.६३ लाख रुपयांची IMX ३डी तिकिटे विकली गेली आहेत. हिंदीत ४१ ते ५१ लाख आणि ब्लॉक सीट्सचा आकडा मोजला तर पहिल्या दिवशी १.३० कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ‘लाल सिंग चड्ढा’ला मागे टाकणार अशी चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा- “मला मुली आवडतात…” सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेहचं वक्तव्य चर्चेत
‘लाल सिंग चड्ढा’च्या आगाऊ बुकिंगमध्ये ९ हजारांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली होती. पण ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दोन दिवसांतच हा पार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सर्व ३डी आणि २डी तिकिटे जोडल्यास ‘ब्रह्मास्त्र’ची आतापर्यंत एकून १०६११ तिकिटे विकली गेली आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चे आगाऊ बुकिंग नवे रेकॉर्ड बनवू शकते, असा दावाही काही मीडिया रिपोर्ट्सनी केला आहे. कोरोनानंतर हा सर्वाधिक तिकीट बुकिंग झालेला दुसरा चित्रपट ठरू शकतो. याआधी ‘केजीएफ २’ची सर्वाधिक अॅडवांस तिकिट बुकिंग झाली होती. यासोबतच निर्मात्यांना सोलो प्रदर्शनाचाही फायदा मिळू शकतो.