बॉलिवूडमधील बहुचर्चित बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटालादेखील बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला. परंतु, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ४२ कोटींची कमाई करत चित्रपटाने देशांतर्गत १०० कोटींचा आकडा पार केला.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर वीकेंडलाही पाहायला मिळाली. प्रदर्शानाच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६ कोटींचा गल्ला जमवला. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १२५ कोटींची तर वर्ल्ड वाइड २१० कोटींची कमाई केली आहे.रविवारी, दाक्षिणात्य भाषांमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली. यातील तेलुगु भाषेतील चित्रपटाने आत्तापर्यंत सर्वाधिक १३ कोटींचा गल्ला जमवला आहे. दाक्षिणात्य भाषांमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे व्हर्जन सोमवारी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही पाहा >> Photos : ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवं घर, फोटो शेअर करत म्हणाली “स्वत:चं घर…”

‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत १०९ ते ११० कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्याच सर्वाधिक कमाई केलेल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी ‘ब्रह्मास्त्र’ एक ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसाठीदेखील हा चित्रपट बिग ओपनर ठरला आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई केलेल्या ‘संजू’चा रेकॉर्ड ‘ब्रह्मास्त्र’ने मोडीत काढला आहे.

हेही वाचा >> “चित्रपट सुरू झाला की…” ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल नीतू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या निमित्ताने आलिया-रणबीर पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र दिसले. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून अशी तगडी स्टार कास्ट आहे. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयनेदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकणार नाही, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, सध्या तरी बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’ची जादू पाहायला मिळत आहे.

Story img Loader