रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दोन दिवसांमध्येच या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. बॉयकॉट ट्रेंडमुळे चर्चेत असलेला हा चित्रपट चालणार की नाही याबाबत शंका होती. मात्र बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चाही समावेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडलेल्या या चित्रपटाने बॉयकॉट गँगला मात देत स्वतःला सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाचे प्रदर्शन पाहून त्याचे निर्माते आणि स्टारकास्ट खूप खूश आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

पहिल्या भागाला मिळालेले यश बघता आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पुढील भागाची घोषणा केली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी इंडीयन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला, ‘मी आता फक्त काहीच गोष्टी चित्रपटाबद्दल सांगू शकतो. दुसऱ्या भागात कथा कशा पद्धतीने दाखवायची याबद्दल आमच्या संकल्पना स्पष्ट आहेत. अयान मुखर्जीच्या मते ब्रह्मास्त्रचा पुढील भाग हा पहिल्या आणि तिसऱ्या भागाची सांगड घालणारा असेल’. दुसऱ्या भागात ब्रह्मास्त्रामुळे समाजाला आणि जगाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे ते दाखवण्यात येणार असल्याचे त्याने पुढे सांगितले. तो पुढे म्हणाला ‘पहिला भाग हा या कथेचा फक्त पाया होता. देव हे पात्र कोण साकारणार आहे हे मी आता सांगू शकत नाही. योग्य वेळ आल्यावर मी जाहीर करेन.’ आमचे लक्ष हेच आहे की दुसरा भाग तीन वर्षांनी म्हणजे २०२५ साली प्रदर्शित करायचा आहे.

चिरंजीवी आणि सलमान खान ‘गॉडफादरमध्ये’ एकत्र थिरकणार? गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पहिल्या भागात शिवाच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे. पण पहिल्या भागात या पात्रांबद्दल काहीच दाखवण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणबीरच्या शिवाच्या आई-वडिलांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे आगामी काळातच समजणार आहे.

आतापर्यंत या चित्रपटाने ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘भुलभुलैय्या २’ ला मागे टाकले आहे.परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ दिसून येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.