आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. जबरदस्त स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच मोठी मेहनत या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने घेतली आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. नुकतंच ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच चेन्नईमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाात ब्रह्मास्त्र चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. नुकतंच त्यांनी हा चित्रपट कसा वाटला त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, “हा चित्रपट भारतीय संस्कृती जगासमोर आणेल. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट केवळ बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. त्यासोबतच तो वर्षातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. अयानने अशाप्रकारे एका वेगळ्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटातून आपल्याला शस्त्रांबद्दलचा इतिहास, त्याची माहिती समजणार आहे.”
आणखी वाचा : हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने इन्स्टा स्टोरीवर केलं इंग्लंडमधील भारतीय हॉटेलचं कौतुक अन् त्यानंतर…

“अयानने जे जग निर्माण केले ते निर्माण करणे सोपे नाही. त्याने एक अशी शक्ती निर्माण केली आहे, ज्याला अजूनही काही मर्यादा आहेत. त्याने यात एका वाईटावर विजय मिळवण्यासाठी चांगला संघर्ष कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट एखाद्या परीकथेसारखा नक्कीच नाही. एका चित्रपटाची कथा सांगण्याची ही वेगळी पद्धत आहे. यामुळेच मला ब्रह्मास्त्र या चित्रपटाने आकर्षित केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे निश्चितरित्या प्रेम मिळेल अशी मला आशा आहे”, असेही एस.एस राजमौली म्हणाले.

“ब्रह्मास्त्र हा चित्रपट इतर बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटांसारखा नाही. तो व्यावसायिकरित्या भव्य आहे. ब्रह्मास्त्रसाठी अयानने त्याच्या आयुष्यातील दहा वर्षे खर्च केली आहे. मी बाहुबलीसाठी पाच वर्षे दिली असल्याने मला त्याच्याबद्दल आदर वाटते”, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : लाइगर मुव्ही रिव्यू : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने या ट्रेलरची सुरूवात होत आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmastra first review out ss rajamouli praise ranbir kapoor alia bhatt movie nrp
Show comments