रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर आता प्रदर्शनासाठी तयार आहे. येत्या ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. यावर प्रेक्षकांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि समीक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या केआरकेनं देखील या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना ट्रेलरसह कलाकारांची देखील खिल्ली उडवली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीचं आहे तर निर्मिती करण जोहर करत आहे. केआरकेनं या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एक ट्वीट केलं आहे आणि या ट्वीटची सुरुवात हीच माहिती देत केली आहे. त्यानं लिहिलं, ‘मुगल-ए-आजम’ चित्रपट तयार करण्यासाठी १५ वर्षं लागली होती. त्यानंतर आता ‘ब्रह्मास्त्र’ असा चित्रपट आहे ज्याच्यासाठी बराच मोठा कालावधी लागला आणि बराच पैसा खर्च करण्यात आला आहे. ९ वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर प्रतिक्रिया देताना केआरकेनं त्याची खिल्ली उडवली आहे. त्याने एका मागोमाग एक काही ट्वीट केले आहेत.

केआरकेनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी करण जोहर आणि अयान मुखर्जी यांच्याशी सहमत आहे की हा चित्रपट माणसांसाठी नाहीच. हा चित्रपट तर मंगळावर राहणाऱ्या एलियन्ससाठी तयार करण्यात आला आहे.’ आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, ‘आज करण जोहरचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे. मला वाटत लोक अद्याप करणला माफ करू शकलेले नाहीत.’

आणखी वाचा- Video : “आणखी किती फोटो काढणार?” चाहत्यावर मलायका अरोरा भडकली

आणखी वाचा- “मी जर तुम्हाला चुकीची वाटत असेन तर…” ट्रोलर्सना अँबर हर्डचं सडेतोड उत्तर

ट्वीट व्यतिरिक्त केआरकेनं ‘ब्रह्मास्त्र’ ट्रेलर रिव्ह्यूचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यात त्यानं अगदी आलिया भट्ट, रणबीर कपूरपासून मौनी रॉयपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली आहे. एवढंच नाही तर त्यानं करण जोहर आणि अयान मुखर्जी यांची देखील खिल्ली उडवली आहे. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात नागार्जुन, अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तब्बल ४०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात ९ सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader