बॉलिवूडमध्ये सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन असे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तयार होणाऱ्या अनेक चित्रपटांना हवे तसे यश मिळवता आलेले नाही. त्यात सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण चित्रपटसृष्टीवर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिग्गजांनी या स्थितीवर भाष्य केले आहे. नुकतंच या चित्रपटातील कलाकारांची नावं समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खानही झळकणार असून त्याचा एक प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र:’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आहे. अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. रणबीरसोबतचा हा अयानचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची कल्पना त्याला ये जवानी है दिवानी या चित्रपटाच्या वेळी सूचली होती. तेव्हाच त्याने रणबीरसोबत हा चित्रपट करायचे ठरवले.

आणखी वाचा : “हा चित्रपट केवळ…” रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर एस. एस. राजामौलींची पहिली प्रतिक्रिया

‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर, आलियासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, तेलुगू सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय असे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यासोबत चित्रपटसृष्टीतील इतर कलाकार देखील या मोठ्या प्रोजेक्टचा भाग असणार आहेत. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मौनीने शाहरुख खान या चित्रपटात झळकणार असल्याचे बोललं जात आहे.

नुकतंच या चित्रपटाबद्दल मौनीला तिच्या चित्रपटाच्या सहकलाकारांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने नकळत रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्यासह शाहरुख खान याचाही उल्लेख केला. या चित्रपटात शाहरुख हा वानरस्त्र हे पात्र साकारणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच त्याचा प्रोमो समोर आला आहे. यापुढे ती म्हणाली, मी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाशी फार आधीच जोडले गेले. तेव्हा माझी भूमिका काही सीन्सपुरती मर्यादित होती. मात्र आता पुढे कथेनुसार त्या भूमिकेचे महत्त्व वाढत गेले आणि आता मी चित्रपटामध्ये मुख्य खलनायिका साकारत आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे.

आणखी वाचा : लाइगर मुव्ही रिव्यू : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

दरम्यान अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स यांचं मिश्रण असलेल्या चित्रपटात सर्व अस्त्रांचं शक्तीस्थान असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmastra karan johar shares clip of vanarastra fans cheer for shah rukh khan nrp