बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा बहुप्रतिक्षित चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील ‘केसरिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. पण या गाण्याबाबत अनेक मीम्स सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले.

आणखी वाचा – रणवीर सिंगचा न्यूड लूक पाहून नेटकरी सुसाट, मजेशीर कमेंट वाचून तुम्हालाही हसू होईल अनावर

‘केसरिया’ गाण्यामध्ये आलिया आणि रणबीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण याचे बरेच मीम्स व्हायरल झाल्यानंतर रणबीरने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच ट्रोल करणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्षच करण्याचं रणबीरने पक्क केलं आहे.

इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरने म्हटलं की, “निर्माता, कलाकार म्हणून आम्ही सगळे एक कलाकृती सादर करतो. या कलाकृतीकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे हे फक्त प्रेक्षकांच्या हाती असतं. आजच्या काळात मीम्स, ट्रोलिंग जीवनाचा एक भाग आहेत. जोपर्यंत प्रीतमचे संगीत तसेच अरिजीत सिंहच्या गायनाचा लोक आनंद घेतात तोपर्यंत सगळं काही ठीक आहे. प्रेक्षकांनी माझ्या आणि आलियाच्या केमिस्ट्रीचा आनंद घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे.”

आणखी वाचा – VIDEO : भर कार्यक्रमात रणवीरने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली, कपड्यांवरून ट्रोल करत म्हणाला…

‘केसरिया’ गाण्याचे मजेदार मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ‘केसरिया’ या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून ते अरिजित सिंगने गायले आहे. संपूर्ण गाणे ईशा आणि शिव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये काही इंग्रजी वाक्यं वापरली गेली आहेत. याच कारणामुळे या गाण्याची खिल्ली उडवण्यात आली.

Story img Loader