‘ब्रह्मास्त्र – पार्ट वन शिवा’ हा बिगबजेट चित्रपट येत्या शुक्रवारी ९ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल ४०० कोटी रुपये इतके असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वात महागडा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची घोषणा २०१७ मध्ये करण्यात आली होती. रणबीर कपूरसह चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी, करण जोहर, अपूर्व मेहता, नमित मल्होत्रा आणि मारिजके डिसूझा यांनी या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ५ हजार भारतात, तर ३ हजार भारताबाहेर अशा ८ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसजसा ‘ब्रह्मास्त्र’चा प्रदर्शनाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाच्या टीमने चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटातील काही शॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या व्हिडीओंमुळे ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ अजून वाढली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या तिकिट बुकींगवरुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचणार असा अंदाज लावला जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’चे आणखी दोन भाग काही वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा- “हे साफ खोटं आहे की…” विवेक अग्निहोत्रींनी समोर आणलं बॉलिवूडकरांचं सत्य

सोमवारी ५ ऑगस्टला दिग्दर्शक अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या टीमसह पहिल्यांदा थ्री-डीमध्ये संपूर्ण चित्रपट पाहिला. तेव्हा त्यांनी एक व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ पहिल्यांदा पूर्णपणे पाहिला असल्याचे सांगितले. त्यासोबत एक मोठी घोषणा केली. अयान मुखर्जीने ”आम्ही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तो चाहत्यांसोबत पाहायचा हे चित्रीकरण सुरू असताना ठरवले होते. ते वचन आम्ही पाळत आहोत.’

आणखी वाचा- रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘या’ हिट चित्रपटाला मागे टाकले

‘ब्रह्मास्त्र’चा प्री-रिलीजचा शो मुंबईमध्ये ८ सप्टेंबर रोजी होणार असून आमची टीम चाहत्यांसह चित्रपट पाहण्याचा आनंद घेणार आहे” असं अयान मुखर्जीनं सांगितलं. या व्हिडीओला आलियाने ‘अटेंशन! अटेंशन!!! फक्त ३ दिवस बाकी…’ असे कॅप्शन दिले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या शिवाय शाहरुख खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmastra team big announcement day before the release film will be watched with fans mrj