Brahmastra Trailer Release : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. अगदी चित्रपटाच्या घोषणेपासून ते लूक आणि पोस्टर लॉन्चपर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत राहिल्या होत्या. मागच्या बऱ्याच काळापासून सर्वांना या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा होती. पण ही प्रतीक्षा आता संपली असून नुकताच ‘ब्रह्मास्त्र’चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्रेलरची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयान मुखर्जीचं (Ayan Mukerji) दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन (Amibah Bachchan) यांच्या आवाजात या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर हळूहळू रणबीर कपूरची झलक पाहायला मिळते. या ट्रेलरमध्ये महाबली आणि सर्वात प्रभावी, शक्तीशाली अस्त्रचा शोध घेण्याची कथा दाखवण्यात आली आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स यांचं मिश्रण असलेल्या चित्रपटात सर्व अस्त्रांचं शक्तीस्थान असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmastra trailer release today ranbir kapoor alia bhatt amibabh bachchan mouni roy in lead role mrj