आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळाला. जबरदस्त स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच मोठी मेहनत या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने घेतली आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : “स्वतः धर्मांतर केलेल्याने विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्वं करू नये,” कंगनाने पुन्हा साधला महेश भट्ट यांच्यावर निशाणा

सोशल मीडियावर बायकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या शुक्रवारपासून ‘ब्रह्मास्त्र’ चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस या बड्या थिएटर्समध्ये मिळून ‘ब्रम्हास्त्र’ची एकूण ५० हजारांच्या वर तिकिटं विकली गेली आहेत. रविवारपर्यंत संपूर्ण देशात या चित्रपटाची ६५ हजारांच्या वर तिकिटं विकली गेली. त्यामुळे या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगमुळे झालेली कमाई २.५५ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. यात ब्लॉक सीट्सला जोडलं तर प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने जवळजवळ ४ कोटींपेक्षा अधिक रक्कम कमावली केला आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असाच प्रतिसाद मिळत राहिला तर हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई करू शकेल असे बोलले जात आहे. याआधी सलमान खानचा ‘दबंग 3’ आणि रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २० कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात यशस्वी झाले होते.

‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित व्हायला अजून चार दिवस बाकी आहेत, पण चार दिवसात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असाच चांगला प्रतिसाद मिळाला तर हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वॉर’ आणि यावर्षी प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या २’च्या अॅडव्हान्स बुकिंगमधून झालेल्या कमाईचा विक्रम मोडेल.

आणखी वाचा : आलिया भट्ट बनली गायिका, गायले ‘हे’ लोकप्रिय गाणे

‘ब्रह्मास्त्र’ भारतात जवळपास ५ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader