भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ब्राझीलने भारतीय चित्रपटसृष्टीला सन्मानित करण्यासाठी दोन पोस्टाची टिकीटे प्रसिद्ध केली आहेत. राष्ट्रव्यापी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ५ मे ला ब्रासिलिया येथे नुकतेच या टपाल तिकीटांचे उदघाटन करण्यात आले.
कोची येथे राहणा-या सत्या राय यांनी ही तिकीटे डिझायन केली आहेत. भारतीय राजदूत अशोक तोमर, चित्रपट महोत्सवाचे क्यूरेटर्स आणि दिग्दर्शक- आनंद ज्योती, कैरिना बिन्नी पकपिल्ली यांच्याहस्ते तिकीटांचे उदघाटन करण्यात आले.
भारतीय चित्रपटसृष्टीचा सन्मान करणारे ब्राझील पोस्ट तिकीट!
राझीलने भारतीय चित्रपटसृष्टीला सन्मानित करण्यासाठी दोन पोस्टाची टिकीटे प्रसिद्ध केली आहेत.

First published on: 20-05-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazil issues stamps to honour indian cinema