ब्राझीलचा लोकप्रिय गायक एमसी केविन डेथचे निधन झाले आहे. एमसी केविन हा फक्त २३ वर्षांचा होता. १६ मे रोजी एमसी केविनने शेवटचा श्वास घेतला. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरो मधील एका हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून केविन खाली पडला आणि त्याचे निधन झाले.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केविन हॉटेलच्या ११ व्या मजल्यावर राहतं होता. ५व्या मजल्यावर तो त्याच्या काही मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेला होता. केविन हॉटेलच्या बाल्कनीत होता, आणि तिथून तो अचानक खाली पडला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यावर तपास सुरु आहे.
View this post on Instagram
त्याच्या अपघातानंतर अग्निशमन दल लगेच तिथे पोहोचले होते. त्यांनी लगेच केविनला रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केविनने नुकतेच गर्लफ्रेंड डिओलेने बेजेराशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला २ आठवडेही पूर्ण झाले नव्हते. तर डिओलेने ही एक क्रिमिनल लॉयर आहे.
View this post on Instagram
केविनच्या निधनानंतर डिओलेनेने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला. “तू माझ्या आयुष्याचे प्रेम आहेस आणि कायमच राहशील. मला सर्वात जास्त प्रेम आणि आदर देणारा तू होतास. देवाकडे जा, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन,” अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते.
आणखी वाचा : खुद्द आदित्य नारायणनेच केला इंडियन आयडलचा पर्दाफाश
केविनचे पहिले गाणे हे २०१३ मध्ये प्रदर्शित झाले होते. त्यावेळी तो फक्त १६ वर्षांचा होता. Cavalo de Troia हे त्याच्या गाण्याचे नाव असून हे गाणं युट्युबवर कोट्यावधी लोकांनी पाहिले आहे.