अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहेत. याच दरम्यान एका ब्राझिलियन गायकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. तो स्टेजवर गाणं गात असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचं निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्राझिलियन गॉस्पेल गायक पेड्रो हेनरिक याचे निधन झाले आहे. १३ डिसेंबर रोजी स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना त्याचा मृत्यू झाला. गायक अचानक स्टेजवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३० वर्षांचा होता. पेड्रो हेनरिकचे चाहते आणि कुटुंबियांना त्याच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे. तो स्टेजवर कोसळला तेव्हाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती

हेनरिक एका धार्मिक कार्यक्रमात त्याचं सुपरहिट गाणं गात होता. हा कार्यक्रम ब्राझीलमधील फेरा डी सांताना शहरातील कॉन्सर्ट हॉलमधून ऑनलाइन प्रसारित करण्यात आला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की हेनरिकला प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि नंतर गाणं गातो. पण हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक तो स्टेजवर कोसळतो. दरम्यान, नंतर त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिली आहे.

श्रेयस तळपदेच्या पत्नीने पोस्ट करून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाली…

हेनरिकचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले, अशी माहिती त्याच्या बँडने दिली. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी सुइलान बॅरेटो आणि त्यांची मुलगी झोई आहे. तिचा जन्म १९ ऑक्टोबर रोजी झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazilian singer pedro henrique died of heart attack during live performance video viral hrc