हॉलिवूड अभिनेता माईक बटायेह यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी ‘ब्रेकिंग बॅड’मध्ये लॉन्ड्रॉमॅट मॅनेजर डेनिस मार्कोव्स्कीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. १ जून रोजी घरात झोपले असताना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल माहिती दिली आहे.

निसा देवगणचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन नक्की आहे तरी कोण? पार्टीतील ‘त्या’ फोटोंमुळे आहे चर्चेत

माईक बटायेह यांना हृदयाशी संबंधित कुठलाही आजार किंवा त्रास नव्हता, पण अचानक झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. माईक यांच्यावर १७ जून रोजी मिशिगनमधील प्लायमाउथ येथील रायझन क्राइस्ट लुथेरन चर्चमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.

माईक बटायेह यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय व चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ते सर्वांच्या आठवणींमध्ये कायम असतील, असं कुटुंबीयांनी म्हटलंय. २०११ ते २०१२ पर्यंत ‘ब्रेकिंग बॅड’च्या तीन भागांमध्ये माईक यांनी काम केलं होतं. ‘अमेरिकन ड्रीम्झ’, ‘दिस नॅरो प्लेस’ आणि ‘डेट्रॉइट अनलेडेड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता.

Story img Loader