गेले काही महिने बॉलीवूडमध्य ब्रेकअपचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कपल्समध्ये या वर्षात दुरावा निर्माण झाला. प्रथम रणबीर-कतरिना, त्यानंतर फरहान-अधुना यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता अभिनेता सुशांत सिंग राजपूत व टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. २००९ पासून सुशांत व अंकिता एकत्र असून गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत.
डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सुशांत व अंकिताने आपले सहा वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतने त्यांचे राहते घर सोडले असून, सध्या तो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहे. या दोघांनी वेगळे होण्यामागचे कारण अंकिताचे करियर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अंकिताकडे काहीच काम नाही आहे. तर दुसरीकडे, सुशांतने यशाच्या शिखरावर आहे. इतकेच नाही तर सुशांतच्या वाढदिवसालाही अंकिता उपस्थित नव्हते असे म्हटले जातेय.
आता नक्की खरे काय आहे हे त्या दोघांनाच माहित. अंकिता आणि सुशांतने अद्याप याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.