बॉलिवूडमधल्या ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक म्हणून कतरिना कैफ ओळखली जाते. नुकतीच ती एका मासिकाच्या कव्हरपेजवर झळकली या निमित्तानं मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक पैलू उलगडले. रणबीरसोबत झालेलं ब्रेकअप, त्यानंतर आलियानं जोडीदार म्हणून केलेली रणबीरची निवड, आलिया आणि तिच्या मैत्रीत आलेला दुरावा या सर्व कारणामुळे कतरिना काहीशी नाराज होती. पण ब्रेकअप ही गोष्ट आता माझ्यासाठी आशीर्वाद ठरली आहे असं म्हणत ती यावर व्यक्त झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रेकअप हे माझ्यासाठी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठरलं आहे. आयुष्यात पहिल्यांदाच यामुळे मी स्वत:वर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. मला स्वत:बद्दल कित्येक गोष्टी नव्यानं कळू लागल्या आहेत. आपल्याला स्वत:बद्दल काही गोष्टी ठावूक नसतात पण या सगळ्यात मी स्वत:ला नव्यानं ओळखू लागले. आता या गोष्टी माझ्यासाठी फारच दुय्यम आहेत’ असं कतरिना म्हणाली.

गेल्या सहा वर्षांपासून ती अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती. मात्र कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं तिच्याच जवळच्या मैत्रीणीला डेट करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे आलियानं रणबीरसोबतचं तिचं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. यामुळे कतरिना खूपच दुखावली होती. पण आता मात्र या सगळ्यातून सावरून तिनं नवीन सुरूवात केली आहे. सध्या ती ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर याच महिन्यात तिची महत्त्वाची भूमिका असलेला ‘झिरो’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breakup was a blessing said katrina kaif