बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याचा सोशलम मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. भारतातच नाही तर परदेशातही विकीचे बरेच चाहते आहेत. खास करून तरुणींमध्ये विकी कौशलची जास्तच क्रेझ आहे. सध्या सोशल मीडियावर विकी कौशलचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात एक चाहती लग्नाच्या मंडपात जाण्याआधी विकी कौशलसोबत फोटो काढण्याचा हट्ट धरून बसलेली दिसत आहे. एवढंच नाही तर तिने यासाठी नवऱ्यालाही वाट बघायला लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये वधूच्या वेशात ही तरुणी विकी कौशलसोबत फोटो काढण्याचा हट्ट करताना दिसत आहे. व्हिडीओमधील ही तरुणीस, “आज मी माझ्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढल्याशिवाय मंडपात जाणारच नाही.” असं म्हणताना दिसत आहे. यासाठी ती नवऱ्याला वाट बघायला लावण्यास तयार आहे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये ती तरुणी सांगते, “माझा होणारा नवरा खाली वाट पाहत आहे पण जोपर्यंत मला विकी कौशलसोबत फोटो काढून मिळणार नाही तोपर्यंत मी मंडपात जाणार नाही.” त्यानंतर या वधूच्या मैत्रिणी देखील विकी कौशलसोबत एक फोटो काढण्याची परवानगी देण्याची विनंती करताना दिसतात. पण तरीही या नवरीला विकी कौशलसोबत फोटो काढण्याची संधी काही मिळतच नाही. अखेर तिला विकीसोबत फोटो न काढताच मंडपात जावं लागतं.

आणखी वाचा- विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, म्हणाली…

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ २०२० मधील आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी विकी कौशल मसूरीमध्ये शूटिंग करत होता आणि त्याच्या सोबतच्या कलाकारांसोबत एका हॉटेलमध्ये थांबला होता. याच हॉटेलमध्ये या तरुणीचं लग्न होतं. जेव्हा तिला विकी कौशलही या हॉटेलमध्येच थांबलाय हे समजलं तेव्हा तिने त्याच्यासोबत फोटो काढण्याचा हट्टच धरला होता.