राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातून ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर्ट मलिकने मिल्खा यांचे वडिल संपूर्ण सिंगची भूमिका केली आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याने काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये ट्रू लाइज, सेक्स अॅण्ड सिटी २, सिटी ऑफ जॉय, पॅसेज टू इंडिया, ज्वेल इन द क्राउन या चित्रपटांचा समावेश आहे.
“ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये इंग्रजी बोलणा-या भारतीय वर्ण असलेल्या व्यक्तिची भूमिका नेहमी करत आलो. मला मातृभाषेचा वापर भारतीय चित्रपटांसाठी करण्याची इच्छा होती. पण अनेक वर्षे झाले माझी ही इच्छा अपूर्णच होती”, असे मलिक एका वक्तव्यात म्हणाले. ज्यावेळेस मेहरा यांनी सदर भूमिकेसाठी मलिकला विचारले त्यावेळेस त्यांना फार आनंद झाल्याचे सांगितले.
ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत
राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातून ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर्ट मलिकने मिल्खा यांचे वडिल संपूर्ण सिंगची भूमिका केली आहे.

First published on: 01-07-2013 at 11:50 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsभाग मिल्खा भागBhaag Milkha Bhaagमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British actor art malik plays milkha singhs dad in biopic