वडिलांच्या कंजरवेटरशिपमधून मुक्त झाल्यानंतर ब्रिटीश अभिनेत्री ब्रिटनी स्पीअर्स सध्या तिच्या स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे ब्रिटनी स्पीअर्स नेहीच चर्चेचा विषय ठरते. मागचा काही काळ स्वतःच्या वडिलांच्याच विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानं तिचं नाव सोशल मीडियावर चर्चेत राहिलं होतं. पण आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनीनं सोशल मीडियावर चक्क न्यूड फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या ४० वर्षीय ब्रिटनीनं स्वतःचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ब्रिटनीनं इन्स्टाग्रामवर न्यूड मिरर सेल्फी शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘स्वतंत्र महिलेची एनर्जी. यापेक्षा जास्त चांगली जाणीव याआधी कधीच झाली नाही.’ अर्थात तिच्या फोटोंचं हे कॅप्शन १३ वर्षांपासून वडिलांकडे असलेल्या तिच्या कंजरवेटरशिपबाबत भाष्य करतं. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत.

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ब्रिटनीला वडिलांच्या कंजरवेटरशिपमधून मुक्त करण्यात आलं. ब्रिटनीची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं ती तिच्या संपत्तीची तसेच स्वतःची काळजी घेऊ शकत नसल्यानं २००८ साली तिची कंजरवेटरशिप तिच्या वडिलांना देण्यात आली होती. त्यानंतर वडील आणि मुलगी यांच्यात मागची बरीच वर्षं या मुद्द्यावरून वाद सुरु होता. अखेर मागच्या वर्षी ब्रिटनीला तिचं स्वातंत्र्य परत मिळालं. त्यानंतर काही दिवसांतच तिने तिचा बॉयफ्रेंड सॅम असगरीशी साखरपुडा उरकला होता.

दरम्यान मागच्या आठवड्यात ब्रिटनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिने तिची बहीण जेमी लिन स्पीअर्सला सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. ब्रिटनी आणि तिच्या वडिलांमध्ये झालेल्या वादानंतर तिनं तिच्या बहिणीवरही गंभीर आरोप केले होते. आपली बहीण आपल्याला पाठिंबा देत नसल्याचं तिने म्हटलं होतं.

Story img Loader