Britney Spears News : हॉलिवूड पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) ही तिच्या विविध वक्तव्यांमुळे, कपड्यांमुळे, हावभावांमुळे चर्चेत असते. या सगळ्या घटना घडल्यानंतर आता ब्रिटनी तिच्या खासगी आयुष्यातील प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. लॉस एंजलिस या ठिकाणी एका हॉटेलमध्ये तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालं. हे भांडण इतकं कडाक्याचं होतं की ब्रिटनी स्पिअर्स तिथून उठली आणि विचित्र अवस्थेत बाहेर पडली. ज्यानंतर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. ब्रिटनी टॉपलेसच बाहेर पडली. तिने एक ब्लँकेट आणि उशी फक्त समोर धरली होती. तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

फोटो व्हायरल कसे झाले?

ब्रिटनी स्पिअर्सला लॉस एंजलिसमधल्या बड्या हॉटेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलं जात असल्याचं फोटोग्राफर्सनी पाहिलं. त्यानंतर तिचे फोटो काढले. ब्रिटनीचे हे फोटो त्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच ब्रिटनीने या सगळ्या प्रकाराबाबत एक पोस्ट लिहिली आहे. हे सगळं प्रकरण २ मे च्या दिवशी झालं आहे.

Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mamta Kulkarni on her connection with drug lord Vicky Goswami
“दुबईत तुरुंगात असताना विक्कीने मला…”, ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा; बॉलीवूड कमबॅकबद्दल म्हणाली…
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
Woman married with two men now she live with two husbands in up viral video on social media
आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
mahira khan ranbir kapoor viral photo controversy
रणबीर कपूरबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी तेव्हा रोज…”
mrunal thakur favourite marathi words 2
Video : “मराठीतील तीन सर्वात छान शब्द कोणते?”, चाहत्याच्या प्रश्नाला मृणाल ठाकूरने दिलं उत्तर; म्हणाली…

हे पण वाचा- हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

नेमकं काय घडलं?

एका इंग्रजी वेबसाईटने जी माहिती दिली त्यानुसार ब्रिटनी आणि तिचा बॉयफ्रेंड पॉल रिचर्ड हे दोघे एका बड्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचं रुपांतर मारामारीत झालं. ज्यानंतर ब्रिटनी अनवाणी, अर्धनग्न आणि अर्धवट ब्लँकेट गुंडाळून हॉटेलबाहेर पडली. तिने चेहऱ्यासमोर उशीही धरली होती. २ मेच्या मध्यरात्री हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनीला अशा अवस्थेत पाहून अँब्युलन्स बोलवण्यात आली. मात्र तिने अँब्युलन्समधून जाण्यास नकार दिला.

बॉयफ्रेंडच्या आणि ब्रिटनीच्या पायाला भांडणात आणि मारामारीत जखमा झाल्या होत्या हे दिसत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. सध्या ब्रिटनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जे फोटो समोर आले आहेत त्यात ब्रिटनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकही दिसत आहेत.

ब्रिटनीने याबद्दल लिहिलेली पोस्ट काय?

या सगळ्या प्रकाराबाबत ब्रिटनीने एक पोस्ट लिहिली आहे. माझी मनस्थिती ठीक नाही अशा बातम्या मी वाचल्या ज्या सपशेल खोट्या आहेत. मी रोज अशा प्रसंगांना सामोरी जाऊन आता माझ्यात बळ आलं आहे हे ज्या लोकांना माहीत आहे त्यांचा मी आदर करते. जे काही झालं त्यानंतर आता मी इतकंच सांगू इच्छिते की मला आत्ता एक टूथब्रश हवा आहे. तसंच एक एक्स्प्रेसो कॉफी हवी आहे. मी हे का पोस्ट करते आहे ते देखील मला आत्ता नीट सांगता येणार नाही. मी एक मुलगी आहे आणि माझे पिरियड्स सुरु आहेत. तसंच रात्री माझा पायही मुरगळला आहे. मला पॅरामेडिकल सेवाही उपलब्ध झाली नाही. मला वाटतंय माझा मानसिक छळच झाला आहे. मी आता बोस्टनला जाते आहे. Peace अशी पोस्ट ब्रिटनीने लिहिली आहे.

Story img Loader