बॉलीवूडचा खिलाडी अक्षर कुमार, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकी श्रॉफ यांचा आगामी ब्रदर्स चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला.
दोन भावांमधील बॉक्सिंगचे युद्ध, त्यासाठीची मेहनत आणि भावनिक किनार या मुद्द्यांना समरुप असणाऱया या ट्रेलरमध्ये अक्षय आणि सिद्धार्थचे दमदार फायटींग सिन्स आहेत. डेव्हिड आणि माँटी फर्नांडिस या दोन भावांच्या भुमिकेत अक्षय आणि सिद्धार्थ चित्रपटात दिसणार आहे. तर, सिद्धार्थच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ साकारत आहेत. अक्षय कुमार चित्रपटात एका महाविद्यालयीन शिक्षकाच्या भूमिकेत आहे. तरीही बॉक्सिंगकडे वळून अगदी एकमेकांचा जीव घेण्याची वेळ या दोन भावांवर का ओढावते याचे गुपीत ट्रेलरमध्ये राखण्यात आले आहे.

Story img Loader