बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजमधून प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर शर्वरीने बंटी और बबली २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शर्वरी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्वरी तिच्या बॉलिवूड पदार्पण पासून तिला भरत जाथव यांच्या नाटकात काम करायला आवडेल या विषयी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.
शर्वरीने नुकतीच एक मुलाखत दिली आणि यावेळी तिच्या ऑडिशन दिवसांविषयी बोलताना म्हणाली, “सुरुवातीचे अनेक वर्ष ही ऑडिशन देण्यातच गेली. त्यानंतर ३ चित्रपटांसाठी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. यावेळी मी छोट्या मोठ्या जाहिरातींमध्ये ही काम केले. एवढं झाल्यानंतर मला बंटी और बबली २ या चित्रपटात काम मिळाले.”
आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य
आणखी वाचा : पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video
पुढे शर्वरीला नाटकात काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. “मला लहानपणापासून ‘सही रे सही’ हे नाटक प्रचंड आवडतं. भविष्यात त्या नाटकात छोटीशी भूमिका साकारायला मिळावी असं माझं स्वप्न आहे. तर सही रे सही या गाजलेल्या नाटकात अभिनेता भरत जाधवची मुख्य भूमिका आहे.”
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
कुटुंबाचं चित्रपटसृष्टीचं बॅकग्राऊंड नसताना अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय कसा घेतला यावर शर्वरी म्हणाली, “जेव्हा मी कळत्या वयात होती, तेव्हा मला चित्रपटाविषयी आकर्षण वाटू लागलं. तेव्हा एखाच्या चित्रपटातलं पात्र मी कसं साकारलं असतं, असा प्रश्न मी स्वत:लाच विचारायचे. लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती, पण या क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवलं नव्हतं. कॉलेजमध्ये असताना एका स्पर्धेत भाग घेतला होता, त्यानंतर मला चित्रपटांबाबत विचारणा होऊ लागली. मग मी ठरवलं की, मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं.”