बॉलीवूडपट ते हॉलीवूड टेलिव्हिन शो.. अशा गेल्या तीन वर्षांच्या व्यस्त वेळापत्रकानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा पाच दिवसांच्या सुटीवर जाणार आहे. नववर्ष सेलिब्रेशनबाबत प्रियांकाला विचारण्यात आले असता तिने पाच दिवसांच्या सुटीवर जाणार असल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून मी मोठी सुटी घेतलेली नाही. व्यस्त वेळापत्रकानंतर आता मला पाच दिवसांची स्वत:साठीची मोकळीक मिळाली आहे. मी माझ्या मित्रपरिवारासोबत सुटीची मजा घेणार आहे, असे सांगत प्रियांकाने सुटीचे ठिकाण मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. पाच दिवसांच्या सुटीत माझा मोबाईलसुद्धा मी बंद ठेवणार असून, पिकनिकच्या ठिकाणाचा कोणाला थांगपत्ता लागू देणार नाही, असेही प्रियांकाने सांगितले.
प्रियांकाची भूमिका असलेला बाजीराव-मस्तानी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात प्रियांकाने काशीबाई म्हणजेच बाजीरावच्या पत्नीची भूमिका साकरली आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रियांच्या भूमिकेचीही कौतुक केले जात आहे. काशीबाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याची कल्पना मला होती. म्हणूनच मला ती साकारण्याची इच्छा होती. चित्रपटातील माझ्या भूमिकेचे सर्व श्रेय हे दिग्दर्शक भन्साळी यांना जाते, असे प्रियांका म्हणाली.
तीन वर्षांच्या व्यस्त वेळापत्रकानंतर प्रियांका पाच दिवसांच्या सुटीवर
प्रियांकाने सुटीचे ठिकाण मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-12-2015 at 13:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Busy priyanka chopra gets five days leave after 3 years