कामात कमालीची व्यस्त असलेली ‘आशिकी-२’ची अभिनेत्री श्रद्धा कपूरने अखेर कामातून वेळ काढून आपले वडील शक्ती कपूर यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत काही आनंदाचे क्षण व्यतित केले. अलिकडेच रोहीत बालसाठी रॅम्पवॉक केलेल्या श्रद्धाने वडिलांबरोबरचे आपले छायाचित्र (सेल्फी) टि्वटरवर प्रसिद्ध केले आहे.

लवकरच ती मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसणार आहे. ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने यूट्यूबवर केवळ दोन दिवसांत १० लाख व्ह्यूज पार केले. चित्रपटाव्यतिरीक्त श्रद्धा फॅशन शो, स्टेज शो आणि जाहिराती इत्यादीमध्ये व्यस्त असते. गेल्या आठवड्यात झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने नृत्य सादर केले होते.

Story img Loader