दीपिका आणि रणवीरचा आलिशान विवाहसोहळा गेल्या आठवड्यात पार पडला. नुकतंच बेंगळुरूमध्ये दीप-वीरनं आपल्या नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीसाठी पारंपरिक वेशात पोहोचलेल्या दीपिकानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. डिझायनर सब्यासाचीच्या साडीत ती अगदीच सुंदर दिसत होती. मात्र रिसेप्शन पार्टीतील दीपिका म्हणजे अनुष्का शर्मा आणि कंगना रणौतच्या लूकची पूर्णपणे सरमिसळ होती अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी पुन्हा एकदा डिझायनर सब्यासाचीला ट्रोल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्यावर्षी अनुष्कानं दिल्लीतील आपल्या रिसेप्शनसाठी जसा लूक ठेवला होता अगदी तसाच मेकअप दीपिकाचाही करण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री कंगना रणौतनं जी साडी परिधान केली होती तशाच प्रकारची साडी आणि ब्लाऊज दीपिकासाठी सब्यासाचीनं तयार करून घेतला होता. या सगळ्या डिझाइन आणि लूकमध्ये बरंच साम्य होतं, त्यामुळे सब्यासाचीच्या सर्जनशीलतेवर अनेकांनी टीका केली.

पारंपरिक पेहराव, कलाकुसर यात हातखंड असलेल्या सब्यासाचीकडून दरवेळी नवीन काहीतरी पाहण्याची अपेक्षा त्याच्या चाहत्यांची असते मात्र यावेळी ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली अशाही प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. याआधी दीपिकानं लग्नात परिधात केलेली साडी हे आपलं क्रिएशन असल्याचं सब्यासाचीनं म्हटलं होतं. मात्र नंतर ही साडी दीपिकाच्या आईनं बेंगरुळुमधल्या प्रसिद्ध साडीच्या दुकानातून खरेदी केली असून त्यावर कलाकुसर मात्र मी केली असं सब्यासाचीनं स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By styling deepika padukone similar to anushka sharma and kangana ranaut sabyasachi mukherjee trolled again
Show comments