केंद्र सरकारने ११ मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले. डिसेंबर २०१९ मध्ये या कायद्याविरोधा देशभर आंदोलनं झाली होती, त्यापैकी काही आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. विरोधी पक्षासह नागरिकांनी व सेलिब्रिटींनीही या कायद्याचा विरोध केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच वर्षांनी केंद्र सरकारने अंमलबजावणीचे आदेश दिल्यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेते व मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा कमल हासन यांनीही ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मते, सीएए हा एका समुदायावर नाही तर संविधानावर हल्ला आहे. ते हा कायदा त्यांच्या मर्जीनुसार इतर समुदायांवरही लागू करू शकतात,” असं कमल हासन म्हणाले.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

काही दिवसांपूर्वी तमिळ अभिनेता थलपती विजयनेही या कायद्याचा विरोध केला होता. तमिळनाडू सरकारने या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करणार नसल्याचं म्हटलं होतं. ‘तमिलागा वेट्री कडगम (टीवीके)’ पक्षाचा नेता थलपती विजयने या कायद्याला विरोध केला होता. “सीएएची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. देशातील सर्व नागरिक समाजात एकत्र आनंदाने रहात आहेत, असं वातावरण असलेल्या देशात भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही,” असं तो म्हणाला होता.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

दरम्यान, या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील हजारो हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्चन नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caa is an attack on the constitution says kamal haasan hrc
Show comments