दिग्दर्शक दिनेश भोसलेचा ‘क्लॅपर’ हा आगामी चित्रपट तुरुंगातील सुधारणांच्या मुदद्यांवर आधारीत आहे. या चित्रपटात प्रियांश चटर्जी, रितुपर्णो सेन गुप्ता, रघुवीर यादव आणि हर्ष छाया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या खास शोला किरण बेदी, सेनगुप्ता, निर्माता ए दुर्गा प्रसाद आणि दिनेश भोसले उपस्थित होते.
या वेळी भोसले म्हणाले, हा चित्रपट कैदी, तुरुंगातील वातावरणावर आणि तुरुंगात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यावर आधारित असून, या विषयावर चित्रपट बनविण्याची माझी फार पूर्वीपासूनची इच्छा हेती. किरण बेदींनी तुरुंगातील कैद्यांचे आयुष्य जवळून पाहिले आहे. तुरुंगात अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी मी किरण बेदींना आमंत्रित केले.
खिळवून ठेवणारा वास्तवादी चित्रपट या शब्दांत किरण बेदी यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा चित्रपट पाहिल्यावर याच विषयावरील व्ही शांताराम यांच्या ‘दो आंखें बारा हात’ चित्रपटाची आठवण होते.
राजकारणी लोकांचे परिवर्तन होऊ शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, आपल्या देशात अजून एका तुरुंगाची आवश्यकता आहे… फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी… आता त्याची खूप गरज आहे. कारण ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या गुन्हात हे एक एक करून पकडले जातील… तेव्हा त्यांच्यासाठी फार मोठ्या तुरुंगाची गरज भासेल.
हा चित्रपट एक महत्वपूर्ण संदेश देत असल्याने आपण या चित्रपटात काम करण्यास तयार झाल्याचे सेनगुप्ता म्हणाली. चित्रपट अर्थपूर्ण असावा, असे मला नेहमीच वाटत आले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाद्वारे समाजात महत्वपूर्ण संदेश पोहोचणे गरजेचे आहे. वास्तवादी चित्रपटाच्या कथेशी प्रक्षेक जोडले जात असल्याचे मत सेनगुप्ताने व्यक्त केले.

Story img Loader