अमेरिकेतील ‘रंगमंच थिएटर विथ कॉज’ या संस्थेने कॅलिफोर्निया शहरात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून उभी केलेली ५० हजार डॉलरची रक्कम भारतातील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींसाठीच्या स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी दिली आहे. याआधी एप्रिलमध्ये झालेल्या कार्यक्रमातूनही सुमारे ३५ हजार डॉलरची देणगी संस्थेतर्फे ‘नाम’ फाऊंडेशनला देण्यात आली होती.

भारताबाहेर राहूनही येथील सामाजिक समस्यांचे भान राखून परदेशातील संसाधनांचा उपयोग भारतीय समाजाला होण्यासाठी ‘रंगमंच थिएटर विथ कॉज’ ही संस्था अमेरिकेत कार्यरत आहे. ही संस्था अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांकडून चालवली जाते. संस्थेतर्फे भारतातील ग्रामीण शाळांतील मुलींच्या स्वछतागृहासाठी काम करणारया ‘सेवा इंटरनॅशनल’ संस्थेला ५० हजार डॉलर्सची देणगी देण्यात आली आहे. देणगी उभारणीसाठी रंगमंचतर्फे‘बावन्नखणी से मुगनयनी तक’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अमेरिकेच्या कॅलिफोíनया शहरात आयोजिण्यात आला होता. यात बंदना सेन आणि नृत्यदिग्दíशका दिपाली विचारे यांनी नृत्यबांधणी केली होती. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन त्यांनी आकारले नव्हते.

याआधीही एप्रिल महिन्यात ‘गीत रामायणा’चा कार्यक्रम सादर करून उभी केलेली ३५ हजार डॉलर्सची देणगी ‘रंगमंच’ने ‘नाम’ फाउंडेशनला दिली होती. ‘रंगमंच’च्या सर्व उपक्रमांची अमेरिकेतील बृहन्ममहाराष्ट्र मंडळाने दखल घेतली असून त्यांच्यामार्फत प्रकाशित होणाऱ्या ‘बृहन्ममहाराष्ट्र वृत्तांता’त संस्थेचा गौरव करण्यात आला आहे. यापुढे ‘सेतू बांधा रे’ हा उपक्रम आयोजित करून अमेरिकेतील संसाधने आणि तांत्रिक ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेला होईल असा प्रयत्न केला जाणार आहे.

Story img Loader