अलीकडच्या काळात मराठी सिनेमा आणि त्याचे विषय ग्लोबल होत चालले आहे. दिग्दर्शक संजीव कोलते दिग्दर्शित “कॅम्पस कट्टा” हा सिनेमा देखील याचं वाटेवर चालत आहे. प्रथमेश गाडवेने याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
एका अशा तरुणाची कथा या सिनेमात मांडली आहे जो सर्वसामान्यांसाठी व्यवस्थेशी लढा देतो. सिनेमाच्या शीर्षकावरूनच सिनेमा कॉलेजविश्वावर आधारित असल्याचे समजते. सिनेमाचा मूळ गाभा हा सामाजिक जीवनातील नीतीमुल्यांवर आधारित असल्याने याचा विषय ग्लोबल असून याद्वारे मांडण्यात आलेले प्रश्न सर्वसमावेशक आहेत. सिनेमाची कथा राजा नावाच्या तरुणाभोवती गुंफण्यात आली असून ही भूमिका अभिनेता संतोष जुवेकरने साकारली आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राजाचा संघर्ष सुरु असतो. आपलं कॉलेज पूर्ण करून स्वतःच करिअर घडविण्याऐवजी कॉलेजात राहून तिथल्या व्यवस्थेशी लढताना जिवाचीही पर्वा न करणार्या राजाची कहाणी म्हणजे “कॅम्पस कट्टा”.
विक्रम गोखले, संतोष जुवेकर, शीतल दाभोळकर, नम्रता गायकवाड, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे, मिलिंद शिंदे, प्रफ़ुल्ल सामंत, दीपक आलेगावकर, किशोरी शहाणे, मानसी मागीकर आणि नवकलाकार राहुल डोंगरे यांच्या महत्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या १८ एप्रिलला “कॅम्पस कट्टा” हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा