डोक्यावरील केस आणि दाढी जरी पांढरी झाली असली तरी चेह-यावरचे हे हसू तुम्हाला थोडेफार ओळखीचे वाटले असेल. आपले पिता आणि मुलगा हे दोघेही प्रसिध्द असल्याचे ते सांगतात. बहुतेकांनी आतापर्यंत ओळखल ही असेल.. हो अगदी बरोबर, हे आहेत बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर.
दिव्या खोसला दिग्दर्शित आगामी ‘सनम रे’ चित्रपटात ऋषी कपूर ८० वर्षाच्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. ऋषी कपूर यांनी स्वतः हा फोटो ट्विट केला असून, त्यांनी म्हटले की ‘दिव्या खोसला कुमारच्या ‘सनम रे’ चित्रपटातील लूक. यात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. ‘सनम रे’ टीमला खूप सा-या शुभेच्छा.’
“Sanam Re”again! Hope this doesn’t scare you? It’s not meant to! pic.twitter.com/jgZXucXJBa
— rishi kapoor (@chintskap) January 30, 2016
पुल्कित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेलाची प्रमुख भूमिका असलेला ‘सनम रे’ चित्रपट येत्या १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.