छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिले जाते. ही मालिका सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणून ही सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध आहे. त्याबरोबरच चंपकलाल, टपू, आत्माराम भिडे, गोली, हाथी हे सर्व सहकलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेतील प्रत्येक कलाकारांचे अनेक जुने फोटो सातत्याने व्हायरल होत असतात. काही वर्षांपूर्वी या मालिकेत बागा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता तन्मय वेकारियाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. सध्या हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी यात चंपकलाल यांना ओळखू शकता का? असा प्रश्नही विचारला आहे.
आणखी वाचा : “हिला काहीच येत नाही…” स्मृती इराणींनी केला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या कास्टिंगबद्दल खुलासा

तन्मयने शेअर केलेला हा फोटो २००७ दरम्यानचा आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियातील असून एका गुजराती नाटकादरम्यान काढलेला आहे. या फोटोत जेठालाल, बाबूजी, कोमल भाभी, बागा हे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कलाकार पाहायला मिळत आहे. या फोटोला तन्मयने फार हटके कॅप्शन दिले आहे.

काही आठवणी कायम हृदयाजवळ असतात. दया भाई दोध दया या गुजराती नाटकादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काढलेला हा फोटो’ असे तो हा फोटो शेअर करताना म्हणाला. त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

तन्मयने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये चंपकलाल यांना ओळखताही येत नाही. यात दिलीप जोशी यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर चंपकलाल यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर बागा याने एक स्वेटशर्ट परिधान केले आहे. अनेक जण या फोटोवर कमेंट करत तो शेअर करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you spot taarak mehta ka ooltah chashmah champak chacha in this throwback pic nrp