दाक्षिणात्य चित्रपटातील मणिरत्नम हे प्रख्यात दिग्दर्शक आहेत. ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिल से’ सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांचा नवा चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ येत्या ३० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या दिसणार आहे, तिच्या बरोबरीने त्रिशा कृष्णन, विक्रम आणि शोभिता धुलिपाला यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट चोल साम्राज्याच्या महाकथेवर आधारित असून तो दोन भागात प्रदर्शित होणार आहे. भारताप्रमाणेच इतर देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॅनडामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे मात्र तिकडे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.
कॅनडातील चित्रपटगृहाच्या मालकांना एक धमकीचा मेल आला आहे. जर या मालकांनी ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रदर्शित केला तर मालकांवर हल्ला होईल अशी धमकी त्या मेलमध्ये आहे. चित्रपटगृहाच्या मालकांना दावा केला आहे की, पोनियिन सेल्वन १ प्रदर्शित झाल्यावर चित्रपटगृहांमध्ये गोंधळ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होईल. केडब्ल्यू टॉकीजने आलेला धमकीवजा मेल आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विटर मध्ये असं म्हंटल आहे, ‘माझ्याकडे हॅमिल्टन, किचनर आणि लंडनचे अपडेट आहेत. सर्व चित्रपटगृहातील मालकांनी PS १ तमिळ किंवा KW टॉकीजचा कोणताही चित्रपट चालवल्यास त्यांच्यावर हल्ला करू अशी धमकी देण्यात आली आहे. इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे ते कळेलच’.
आनंद दिघेंनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवीचं प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडेने घेतलं दर्शन
कॅनडामध्ये दाक्षिणात्य चित्रपटावर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या कुरूप या चित्रपटाला ओंटारियोमध्ये विरोध झाला होता तसेच हल्लादेखील झाला होता. कॅनडामधील गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, तिकडच्या भारतीय नागरिकांना, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियन सेल्वन १’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन ही दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनी ही भूमिका साकारत आहे. ती पझुवूरची राजकुमारी आहे. या चित्रपटाची कथा १९५० ते १९५४ दरम्यान कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या ‘पोनियान सेल्वन’ नावाच्या तमिळ पुस्तकावर आधारित आहे.