कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून आलेले कलाकार आपल्या कलेचा आणि सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहेत. यावर्षी या फेस्टिव्हलमध्ये भारतातून बरेच कलाकार सहभागी झाले आहेत. यात अभिनेत्री दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, उर्वशी रौतेला, तमन्ना भाटिया, हिना खान, हेली शहा, संगीतकार ए आर रहमान इत्यादींचा समावेश आहे. सध्या या सर्वं कलाकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला मात्र तिच्या रेड कार्पेट लुकसाठी आणि विशेषतः मेकअपसाठी ट्रोल केलं जात आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या ऐश्वर्या रायनं पहिल्याच दिवशी रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री केली. आतापर्यंत ऐश्वर्याचे या फेस्टिव्हलमधील दोन लुक समोर आले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. पण काही सोशल मीडिया युजर्सना मात्र ऐश्वर्याचा गेटअप आणि लुक अजिबात आवडलेला नाही. त्यांनी तिला या लुकवरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यानं पहिल्या लुकसाठी पिंक कलरचे आउटफिट्स निवडले होते. तिने डबल कॉम्पॅक्ट ड्रिल ब्लेजर आणि पॅन्ट परिधान केली होती. ज्याची किंमत जवळपास ४ लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्याचा हा लुक सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून यावरून ऐश्वर्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातं आहे. अनेकांनी तिच्या मेकअपवर प्रतिक्रिया देत तिच्या लुकवर टीका केली आहे.

काही नेटकऱ्यांच्या मते या गेटअपमध्ये ऐश्वर्या राय बच्चन म्हातारी दिसत आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर सूज आल्यानं तिचा चेहरा खूपच विचित्र दिसत आहे. एका युजरनं यावर कमेंट करताना लिहिलं, ‘असं वाटतंय की तिने बोटॉक्स केलं आहे ज्यामुळे तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘अरे, ऐश्वर्याच्या चेहऱ्यासोबत काहीतरी चुकीचं झालं आहे. मेकअप मॅजिक काम करत नाहीये.’ तर आणखी एका युजरनं ऐश्वर्याला थेट, ‘म्हातारी दिसतेय’ असं म्हटलंय.

Story img Loader