बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मुळे चर्चेत आहे. दीपिका या फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यांच्या टीममध्ये सहभागी आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचे या फेस्टिव्हलमधील लुक व्हायरल होताना दिसत आहेत. खासकरून तिचा साडीतील लुक बराच चर्चेत आहे. या लुकने केवळ भारतीयांची नाही तर जगभरातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण तिला सध्या या साडीसोबत कॅरी केलेल्या कानातल्यांमुळे ट्रोल केलं जातं आहे.

कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी दीपिका गोल्डन ब्लॅक साडी, हेवी इअररिंग्स, ब्लॅक आय मेकअप अशा रेट्रो लुकमध्ये दिसली. पण जसे या लुक मधील तिचे फोटो व्हायरल झाले तसं सोशल मीडियावर #Justicefordeepikasearlobes ट्रेंड होऊ लागला. अनेक युजर्सनी दीपिकाचे कानातले पाहून चिंता व्यक्त केली. दीपिकाच्या लुकवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, ‘मला समजत नाही लोक स्वतःवर एवढे अत्याचार कशासाठी करतात.’

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

आणखी वाचा- “म्हातारी दिसतेय…” Cannes 2022 लुकमुळे ऐश्वर्या राय झाली ट्रोल

आणखी एका युजरनं कमेंट करताना याचा संबंध थेट दीपिकाच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाशी जोडला आहे. त्याने लिहिलं, ‘अरे देवा हे कानातले… याच्याच खाली सापडेल शांतिप्रियाचा मृतदेह’ तर दुसऱ्या एका युजरने, ‘दीपिकाच्या कानांसाठी मला फार वाईट वाटतंय’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय आणखी अनेक युजर्सनी दीपिकाच्या जड कानातल्यांवरून तिला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा- Vikram Trailer : कमल हासन यांचा धमाकेदार अ‍ॅक्शन अवतार, बहुचर्चित ‘विक्रम’चा ट्रेलर पाहिलात का?

दरम्यान दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. लवकरच ती अभिनेता शाहरुख खान सोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशन सोबत ‘फायटर’मधेही तिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

Story img Loader