सध्या सुरु असलेल्या कान चित्रपट महोत्सवाच्या विशेष शूटींगवेळी बॉलीवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चनने अभिनेत्री फ्रेडा पिंटोची भेट घेतली.
पहिल्यांदाच ऐश्वर्या आणि फ्रेडा या दोघी लॉरिअल पॅरिस या ब्रॅण्डसाठी एकत्र काम करत आहे. दरवर्षी कान चित्रपट महोत्सवात लॉरिअलचे प्रतिनिधित्व करणा-या सर्वांना भेटण्यास मी उत्सुक असते. फ्रेडा पिंटोला वैयक्तिकरित्या मी पहिल्यांदाच भेटले. लॉरिअलचे प्रतिनिधित्व करणा-या आम्हा सर्वजणींमध्ये वैविध्यता असली तरी आमच्या प्रत्येकीची वेगळी अशी खासियत आहे.
२९ वर्षीय फ्रेडा पिंटो हीदेखील ऐश्वर्याला भेटण्यासाठी उत्सुक होती. ऐश्वर्या सेटवर पोहचताच फ्रेडाने तिला मिठी मारून तिची भेट घेतली, अशी माहिती सूत्रानी दिली. ऐश्वर्या आराध्यासोबत कान महोत्सवात गेली असून, २० आणि २१ मे ला ती रेड कार्पेटवर चालणार आहे.

Story img Loader