येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सर्वत्र चर्चा असते. यासाठी तीन मराठी चित्रपट पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नुकतंच याबाबतची माहिती दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १७ मे ते २८ मे दरम्यान फ्रान्समध्ये कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रीकरण आणि पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे हा यामागचा हेतू असतो. यानुसार काही ठराविक मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होतात.

अमिताभ बच्चन यांनी कंगना रणौतच्या ‘धाकड’साठी केलेली पोस्ट डिलीट का केली? समोर आले कारण

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) २०२२ च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्याच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. यात दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई आणि दिलीप ठाकूर या ७ तज्ञांचा समावेश होतो.

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

या समितीने ३२ चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा”, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं” या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.