यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटातील कलाकार छकुली देवकरच्या घरची परिस्थिती बिकट आणि हलाखीची आहे. त्यामुळे तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार छकुली प्रल्हाद देवकर (१५) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा, कान्स चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड

छकुली ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी आहे. तिच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून ती गावातील एका फाटक्या झोपडीत आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात. तर आई ही मोलमजुरी करते, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना मिळाली होती.

कॉमेडियन भारती सिंहविरोधात तक्रार दाखल, दाढी-मिशीवरुन विनोद करणं पडलं महागात

त्यानंतर त्यांनी छकुलीला तात्काळ आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannes international film festival potra movie fame chhakuli deokar one lakh rupees cultural affairs minister amit deshmukh announcement nrp