हॉलिवूड गायिका आणि सिनेअभिनेत्री मायली सायरसच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरातून चोरांनी दागिने आणि एका आलिशान गाडीची चोरी केली. लॉस एंजेलिस पोलीस घरफोडी करणाऱ्या या जोडगोळीचा शोध घेत आहेत. सायरसच्या घरी चोरी झाल्याची तक्रार शुक्रवारी पोलिसांकडे नोंदविण्यात आल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार घरात कोणी नसताना एक पुरूष आणि महिला कुंपण ओलांडून घरात शिरले. त्यांनी घरातून सोने आणि एक आलिशान गाडी चोरून नेली. सदर चोरीचा पोलिस तपास करत आहेत.

Story img Loader